आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना होमपिचवर धक्का! फडणवीसांच्या दत्तक गावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरपंच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने घरच्या मैदानावरच धक्का दिला असून ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातच काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सरपंच निवडून आला आहे. फेटरी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या आहेत, परंतु राष्ट्रवादीने सरपंचपद भाजपच्या हातून हिसकवून घेतले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या धनश्री टोमणे फेटरीच्या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

राज्यभरात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल (सोमवारी) मतदान घेण्यात आले होते. 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान प्रक्रीया पार पडली. यातील 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज 3 हजार 700 ग्रामपंचायतींचाच निकाल जाहीर करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होत आहे. जवळपास 81 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
 
जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या...
> रायगड- 162, रत्नागिरी- 154, सिंधुदुर्ग- 293, ठाणे- 33, पालघर- 50
> पुणे- 168, सोलापूर- 181, सातारा- 256, सांगाली- 425, कोल्हापूर- 435
>उस्मानाबाद- 158
> नागपूर- 237, वर्धा- 86, अमरावती- 250, चंद्रपूर- 52, भंडारा- 361, गोंदिया- 341, गडचिरोली- 24
 
एकूण- 3,666
बातम्या आणखी आहेत...