आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : आमदार बोंद्रे यांनी लागावली पुरवठा निरीक्षकांच्‍या कानशिलात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी बुलडाणा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तुरडकर यांच्‍या कानशीलात लगावली. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली. या प्रकाराचा महसूल कर्मचारी संघटनेने निषेध केला असून, बोंद्रे यांच्‍यावर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण
पांगरी उंबरहंडे या गावातील ग्रामस्‍थांनी आपल्‍या रेशन कार्डच्‍या नूतणीकरणासाठी तहसील कार्यालयात रीतसर अर्ज केला. पण, पुरवठा निरीक्षक हे या कामासाठी मुद्दाहून ग्रामस्‍थांना वेठीस धरत होते. शिवाय त्‍यांनी या कामी गैरअर्थसहायाची मागणी केली, असा आरोप ग्रामस्‍थांनी केली. शिवाय या प्रकरणी आमदार बोंद्रे यांच्‍याकडे तक्रार केली. त्‍यानंतर बोंद्रे हे आज दुपारी ग्रामस्‍थांसह तहसील कार्यालयात गेले. मात्र, या ठिकाणी त्‍यांचा पुरवठा निरीक्षकांसोबत वाद झाला. त्‍यात आमदार बोंद्रे यांनी रागाच्‍या भरात त्‍यांच्‍या कानशीलात लगावली.
पोलिसांत दिली तक्रार
या प्रकरणी पीडित पुरवठा निरीक्षकाने बुलडाणा शहर पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली.
आमदार बोंद्रे यापूर्वीही अडकले होते वादात
एप्रिल 2013 मध्‍ये आमदार बोंद्रे यांनी पैसे उडवल्‍याचा व्‍ह‍िडिओ व्‍हायरल झाला होता. त्‍यामुळे त्‍यावेळी विरोधी पक्ष असलेल्‍या भाजपने त्‍यांच्‍यावर कडाडून टीका केली होती.
पुढील स्‍लाइडववर वाचा,
- खेळताना मोठ्या भावाला लागली फाशी, लहानग्‍याचा अकांत
- एसटी बसच्‍या धडकेत विद्यार्थी ठार, महिला गंभीर
-रत्‍नागिरी जिल्‍ह्यात आढळला पोलिओचा रुग्‍ण, आरोग्‍य विभागात खळबळ
- स्‍कुल बसला अपघात, दोन ठार, पाच जखमी

बातम्या आणखी आहेत...