आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मंत्रालयात साजरी, Google ने देखिल केले अनोखे अभिवादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. - Divya Marathi
मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मुंबई- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दुसरीकडे, गुगल या सर्वात मोठ्या सर्च इंजिनने देशातील पहिल्या शिक्षिकेला अनोखे अभिवादन केले आहे. गुगलने सावित्रीबाई फुलेंचे डुडल तयार करुन त्यांच्या 186 व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. 
 
 
मंत्रालयात झालेल्या जयंती कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॅा. दीपक सावंत, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर मुख्य सचिव डॅा. भगवान सहाय, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमीत मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव बाजीराव जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...