आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसीप्रमाणे तोगडियांवरही कारवाई करा : मलिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- भावना भडकावणारी भाषणे दिल्याबद्दल एमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी याला नांदेडमध्ये येण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. त्याप्रमाणेच विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली.


तोगडिया यांनी गेल्या आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात द्वेषपूर्ण भाषण केले होते. सामाजिक वातावरण बिघडवून, धार्मिक भावना भडकावण्याचे काम करणा-या प्रत्येकाची चौकशी होऊन त्यावर कारवाई व्हायला हवी. तोगडिया यांच्या भाषणाचा टेप पोलिसांकडून तपासली जात असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल, असे मलिक यांनी सांगितले.

उद्धव आणि मुंडेंवर टीका
केवळ हेलिकॉप्टरमधून फिरून दुष्काळ कळत नाही तर लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळ दौ -यावर प्रतिक्रिया देताना मारला. तसेच शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय गोपीनाथ मुंडे यांचेही राजकारण होत नसल्याचे ते म्हणाले. या दोन्ही नेत्यांनी दुष्काळाचे राजकारण न करता शेतक -यांची मदत करायला हवी, असा सल्लाही मलिक यांनी दिला. उद्धव यांच्याकडून दुष्काळाबाबत एक दिवसाच्या विधिमंडळ अधिवेशनाची झालेली मागणीही त्यांनी हास्यास्पद ठरवली. दुष्काळाचे एवढे गांभीर्य वाटत असेल तर त्यांच्या आमदारांनी एकदाही नागपूर अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चाही केली नसल्याचे मलिक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर एक दिवसाचे विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्याच्या घोषणेचा चुकीचा अर्थ लावल्याचे ते म्हणाले.