आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Agitation, Warli Se Link Toll Breakdown By Mns Activist

वरळीतील सी-लिंक टोलनाक्यावरही मनसेचा राडा, राज ठाकरेंवर कारवाई होणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके फोडून धुमाकूळ घातला असून, आजही अनेक ठिकाणी टोलफोड सुरुच आहे. मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल नाक्याची तोडफोड केली. यामुळे पोलिसांनी मनसेचे वरिष्ठ कार्यकर्ते कप्तान मलिक यांच्यासह सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन दिवसांपासून मनसैनिकांनी केलेल्या 'कामगिरी'चे कौतुक केले आहे. आम्हाला अशा कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे. मंत्र्यांनी कंत्राटदारांकडून खाल्लेले पैसे परत द्यावेत. मगच आम्ही टोल तोडफोडीतील नुकसान देऊ, असे शर्मिला ठाकरेंनी ठामपणे सांगितले आहे. दोन दिवसांच्या घडामोडीनंतर सरकारने आता राज ठाकरेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
गृहविभागाने राज यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्ये तपासला सांगितली असून, त्याबाबतचा अभिप्राय आल्यानंतर काय कारवाई करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कायदा सुव्यवस्था बिघडवणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही कारवाईचे संकेत दिले आहेत.
मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीत टोल धोरण स्पष्ट होणार...