आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील कमी उत्पन्न असलेले 44 टोलनाके बंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील सर्व प्रमुख मार्गांवर टोल आकारणीमुळे वैतागलेल्या जनतेच्या प्रचंड आक्रोशापुढे नमते घेत राज्य सरकारने 166 पैकी 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. तसेच एसटी बसना यापुढे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलनाक्यावर टोल द्यावा लागणार नाही. या टोलनाक्यांवर टोल माफ करण्यासाठी विनंती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरात सांगितले.

राज्य सरकारने घोषणा केलेल्या 44 नाक्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाचे 34 टोल नाके तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 10 टोलनाक्यांचा समावेश आहे. केंद्रीय विभागांशी संबंधित सर्व टोलनाके मात्र सुरू राहतील.

औरंगाबाद विभाग
1) चुंबळीफाटा-पाटोदा-मांजरसुंबा (पाटोदा नाका) : 2.37 कोटी
2) औंढा-चौंडी-वसमत (चौंडी नाका) : 5.50 कोटी 3) नगर-आष्टी-जामखेड (पांढरी नाका)- 5.12 कोटी
4) तुळजापूर-नळदुर्ग (देवसिंगा नाका)- 3.82 कोटी 5) तुळजापूर-उजनी (काकरंबा नाका)- 8 कोटी
6) हदगाव-नांदेड (गोजेगाव नाका)

एसटीला टोलमाफी
एसटी बसना रस्ते विकास महामंडळ व सा. बां. विभागाच्या 126 नाक्यांवर टोलमाफी. केंद्रीय प्राधिकरणाच्या 40 टोलनाक्यांवरही माफी मिळावी म्हणून राज्य केंद्राकडे पाठपुरावा करणार.
306 कोटींचा फटका : टोलमाफीने सरकारीला 306 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. सरकारला टोलमाफीची रक्कम ठेकेदारांना द्यावी लागेल परिणामी आर्थिक ताण पडेल.