आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Issue In State, All Party Crictics On Raj Thackeray

तोडफोड केल्याने टोल रद्द होणार नाही- राणे, कडक कारवाई करणार- अजित पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील टोलची तोडफोड करण्यासाठी जाहीर चिथावणी दिल्याने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
राज्यातील टोल तोडफोडीला राज ठाकरे जबाबदार असताना कायदा सुव्यवस्था बिघडवला जात असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही माणिकराव ठाकरे यांनी विचारला आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या व मनसेच्या या कृत्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही राज यांच्यावर टीका केली आहे. मनसेकडून टोलचा मुद्दा हायजॅक केला जातोय, अशी टीका शिवसेनेनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, फोडाफोडीचे राजकारण करून काहीही साध्य होणार नाही. जर कोणी कायदा हातात घेतला तर कोणाचीही गय केली जाणार नाही. संपूर्ण टोल रद्द करणे शक्य नाही. जर सरकारने टोल बंद केला तर इतर सर्व विकासकामे ठप्प होतील. राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते पेटले आहेत. याबाबत कडक कारवाई करण्यात येईल.
उद्योगमंत्री नारायण राणेंनीही राज यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आंदोलन करून, तोडफोड करून टोल रद्द होणार नाही, अशी सूचना देतानाच यातून काहीही साध्य होणार नसल्याचे सांगितले.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी हा आमचा मुद्दा असल्याचे सांगत राज ठाकरेंवर आरोप केले आहेत. टोलविरोधात सर्वप्रथम आम्हीच आंदोलने केली आहेत. महायुती सत्तेवर आल्यावर आम्ही राज्याला टोलमुक्त करू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मनसेने महायुतीचा मुद्दा चोरू नये.
पुढे वाचा, राजप्रकरणी मुख्यमंत्री काय म्हणाले...