आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशेच्या जुन्या नोटा उद्यापासून कुठेच स्वीकारल्या जाणार नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : तुमच्याकडे जर पाचशे रुपयांच्या जुन्या असतील त्याचा वापर तुम्ही उद्या रात्री 12 पर्यंत करु शकणार आहात. केवळ काही महत्त्वाच्या ठिकाणी या नोटा वापरता येणार. उद्या गुरुवार (15 डिसेंबर 2016) हा शेवटचा दिवस असुन त्यानंतर रुग्णालय, विमानतळ, पेट्रोल पंप यापैकी कोणत्याच ठिकाणी या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. परंतू ती मुदतही उद्या संपणार आहे.

15 डिसेंबर नंतर जर तुमच्याकडे पाचशे आणि हजारच्या नोटा असतील तर काय कराल?

- तुम्ही 30 डिसेंबर पर्यंत आपल्या बॅंक खात्यात जमा करु शकता.
- जनधन खात्यातही 50 हजार पर्यंत रक्कम जमा करु शकता.
- सेविंग खात्यातही जुण्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीच लिमिट नाही.
- जर आडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणार असाल तर लक्षात ठेवा ती रक्कम वैध असल्याचा पुरावा आणि कागदपत्र तुमच्याकडे असने आवश्यक आहे.
तुमच्याकडील पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत तुमच्या बँकेत जमा करु शकता. त्यानंतर 31 मार्चपर्यंत आरबीआयकडे प्रतिज्ञापत्र सादर करुन तुम्हाला नोटा बदलून मिळतील.
बातम्या आणखी आहेत...