आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींपेक्षा दानशूर ठरले अझीम प्रेमजी; वाचा, देशातील टॉप 10 दानशूरांची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अझीम प्रेमजी - Divya Marathi
अझीम प्रेमजी
मुंबई- विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. त्यांनी गेल्या वर्षात चांगल्या शिक्षणासाठी 27, 514 रूपये कोटींची रक्कम दान केली. अझीम प्रेमजी फाउंडेशन शिक्षणाच्या विकासासाठी आठ राज्यांतील साडेतीन लाखांपेक्षा जास्त शाळांसाठी काम करत आहे.
प्रेमजींनंतर नंदन नीलेकणी दुसऱ्या एनआर नारायणमूर्ती तिसऱ्या स्थानी आहेत. नंदन-रोहिणी नीलेकणींनी नागरी प्रशासन शिक्षणासाठी 2, 404 कोटींचे दान केले. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्तींनी उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासोबत शिक्षणासाठी 1,322 कोटी दान केले.
चीनचे व्यापार नियतकालिक 'हुरून'ने भारतातील दानशूरांची यादी जाहीर केली आहे. ही यादी 1 नोव्हेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2015 कालावधीत दान केलेल्या रकमेनुसार केली. यात 12 नवीन मान्यवरांचा समावेश केला आहे. यात 35 कोटींचे दान करणारे इन्फोसिसचे 32 वर्षीय रोहन मूर्ती यादीतील सर्वाधिक तरुण दानशूर आहेत. तर, सर्वाधिक ज्येष्ठ 85 वर्षांचे पालनजी मिस्त्री हे आहेत.
पुढे वाचा, देशातील कोणत्या उद्योगपतींनी किती केले दान....
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी दानशूराच्या यादीत 6 क्रमांकावर...