आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात सर्वात जास्त आहे येथे ऑफिसचे भाडे, दिल्ली, मुंबईचाही यात समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीतील 'कनॉट प्लेस' आणि मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स परिसरात ऑफिससाठी भाड्याने जागा मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. प्रॉपर्टी सल्लागार कंपनी सीबीआरईनुसार, ऑफिससाठी जगातील सर्वात जास्त भाडे असलेल्या परिसरांच्या यादीत मुंबईत नरीमन पॉईंट हे 30 व्या क्रमांकावर आहे.

कोणत्या ठिकाणी किती भाडे...
- दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये प्रति वर्गफूट जागेचे वार्षिक भाडे 7 हजार रुपये आहे. गतवर्षी महागड्या ऑफिसच्या यादीत दिल्ली 9 व्या क्रमाकावर होते.
- मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात प्रति वर्गफूट जागेचे वार्षिक भाडे 5400 रुपये आहे तर नरीमन पॉईंट परिसरात 4122 रुपये मोजावे लागतात.
- रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहा शहरांचा दबदबा कायम आहे. त्यात हाँगकाँग हे सर्वात महागडे आहे.
- हाँगकाँग सेंट्रलमध्ये प्रति वर्गफूट जागेसाठी वार्षिक भाडे 269 डॉलर (17256 रुपये) मोजावे लागते.  
- बीजिंगमध्ये फायनान्स स्ट्रीटवर प्रति वर्गफूट जागेसाठी 174 डॉलर वार्षिक भाडे मोजावे लागतले.
- हाँगकाँगमधील वेस्ट कोलून येथे 164 डॉलर प्रति वर्गफूट वार्षिक असा दर आहे.
- टॉप फाइव्ह महागड्या ऑफिसेसमध्ये न्यूयॉर्कमधील मिडटाउन मॅनहट्टन आणि बीजिंगमधील सीबीडीचा समावेश आहे. - टॉप 20 मध्ये दिल्लीतील कनॉट प्लेससह मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या... त्या 10 परिसरांविषयी तिने आहे सर्वात महागडे ऑफिस...
बातम्या आणखी आहेत...