आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी लोकलच्या टपावर तरी कधी दरवाजास लटकून युवक करतात असे जीवघेणे स्टंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत लोकलमध्ये युवक अशा पध्दतीचे स्टंट करत आपला जीव गमावतात. - Divya Marathi
मुंबईत लोकलमध्ये युवक अशा पध्दतीचे स्टंट करत आपला जीव गमावतात.
मुंबई- लोकलमध्ये स्टंट करणाऱ्याविरोधात रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई सुरुच आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक डझनहून अधिक लोकांना याप्रकरणी अटक केली आहे. यातील काहींना समज देऊन तर काहींना दंड आकारून सोडून देण्यात आले. स्टंट करणाऱ्या अनेकांचा या नादात आतापर्यंत मृत्यू देखील झाला आहे. 
 
स्टंट करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक
- मुंबईत आरपीएफने ट्रेनमध्ये स्टंट करण्याच्या आरोपाखाली ज्या युवकांना पकडले त्यातील बहुसंख्य युवक हे 15 ते 25 या वयोगटातील आहेत. 
- हे शाळेत किंवा महाविद्यालयात जाणारे युवक आहेत. ते दररोज लोकलने ये-जा करतात. 
- आरपीएफ मागील काही दिवसांपासून एक मोहिम चालवून लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांना पकडत आहे.
- स्टंटबाजी करणाऱ्यांवर कलम 147, 145, 154, 156 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...