आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Bollywood Actor Actress In Home Shop Business

कलाकार ऑनलाइन : होम शॉपिंगच्या व्यवसायात बॉलीवूड कलाकारांची एंट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात ऑनलाइन आणि होम शॉपिंगचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक खासगी कंपन्यांनी होम शॉपिंग वाहिन्या सुरू केल्या असतानाच आता बॉलीवूड कलाकारांनीही या व्यवसायात प्रवेश केला आहे.
अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांनी "बेस्ट डील टीव्ही'ची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यात सोनाक्षी सिन्हासह अनेक बॉलीवूड कलाकार व क्रिकेटर्सची भागीदारी आहे.
- सलमानची "यात्रा डॉट कॉम'मध्ये पाच टक्क्यांची भागीदारी. एनजीओमार्फत कपड्यांची श्रेणी बाजारात.

- करिश्मा कपूरचा "बेबीओए डॉट कॉम'बरोबर करार. लहान मुलांसाठीच्या उत्पादनासाठी ऑनलाइन स्टोअर सुरू केले.
- हृतिकची माजी पत्नी सुझान, अरबाजची पत्नी मलायका व बिपाशाने एकत्र येत "लेबल कॉर्प ऑनलाइन' सुरुवात केली.
- धक-धक गर्ल माधुरी दीक्षितनेही ऑनलाइनची वाढती क्रेझ पाहून ऑनलाइन डान्स अकादमी सुरू केली आहे.
- सनी लिआेनने "आयअॅमबेशरम डॉट कॉम'च्या माध्यमातून वयस्कांसाठीच्या वस्तूंची ऑनलाइन विक्री सुरू केली.
काय आहे "बेस्ट डील टीव्ही'?

सेलिब्रिटीज कलाकार जे उत्पादन वापरतात ते विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. हे लक्षात घेऊन नवी वाहिनी सुरू करण्यात आली आहे. कलाकार ज्या उत्पादनाशी जोडले गेले आहेत ते आपली उत्पादने या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणतील. वाजवी दरात ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील.
विक्री रकमेपैकी २० ते ३० टक्के रक्कम वाहिनीला मिळणार आहे. लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन आणि ब्यूटी प्रॉडक्ट या वाहिनीवर विकले जाणार असून "मेक इन इंडिया' उत्पादनांवर भर दिला जाणार आहे. मोबाइल मात्र विदेशी ठेवले जाणार आहेत. कॅश ऑन डिलिव्हरीची व्यवस्थाही वाहिनीने उपलब्ध करून दिली आहे.
व्यवसायातील कलाकार
- जितेंद्रने उमेदीच्या काळात बंधूच्या इमिटेशन ज्वेलरीच्या व्यवसायात लक्ष घातले. नंतर जितेंद्रने मुलगी एकतासाठी बालाजी एंटरटेनमेंटची मुहूर्तमेढ रोवली. आज ही कंपनी बीएसईमध्ये नोंदणीकृत आहे.
- काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी एबीसीएलच्या माध्यमातून चित्रपटनिर्मिती सुरू केली, परंतु ते अयशस्वी ठरले. शाहरुख खान चित्रपटनिर्मितीत उतरला आणि चांगले यश प्राप्त केले.
शाहरुखही उद्योगात : शाहरुखने चित्रपट निर्मितीनंतर किडझानिया या लहान मुलांसाठीच्या गेमिंग झोनमध्ये गुंतवणूक केली. सुनील शेट्टीने हॉटेल व्यवसाय वाढवल्यानंतर आता रिअल इस्टेटमध्ये पाऊल ठेवले. अजय देवगणआमिर खानही रिअल इस्टेट क्षेत्रात आहेत. डिंपल कपाडिया व तिची कन्या ट्विंकल डिझायनर मेणबत्तीच्या व्यवसायात आहेत.
- सलमान खान, सनी देओल, अक्षय कुमार, अजय देवगण, सैफ अली, जॉन अब्राहम, अनुष्का शर्मा, अमिषा पटेल चित्रपटनिर्मितीत आहेत. हेमा मालिनीनेही चित्रपट निर्मिती केली, परंतु अपयशामुळे कंपनी बंद केली.
१३ हजार कोटींचे होम शॉपिंग
- सध्या देशात ११ होम शॉपिंग वाहिन्या.
- सीजे लाइव्ह आणि होम शॉप १८ या मुख्य वाहिन्या.
- स्नॅपडीलनेही या व्यवसायात उतरण्याचे ठरवले आहे.
- या उद्योगात प्रत्येक वर्षी ३० टक्क्यांनी व्यवसायवृद्धी.
- उद्योगातील उलाढाल सुमारे १३ हजार कोटी रुपये.