आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Customs Official Held For Rs 12.5 Lakh Bribe

सीमा शुल्क आयुक्ताला लाच घेताना पकडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - खासगी कंपनीकडून 19 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने(सीबीआय)सीमा शुल्क विभागाच्या आयुक्ताला अटक केली. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून कंटेनर सोडण्यास परवानगी देण्यासाठी लाच मागण्यात आली होती.

सीमा शुल्क आयुक्त मनोज कृष्णा याच्यासह कस्टम एजंट जिगर देसाईला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने कृष्णा यांच्या घराभोवती सकाळी सापळा लावला होता. त्यात त्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कृष्णा व त्यांच्या एजंटाच्या घर-कार्यालयाची झडती घेण्यात आली आहे. दोघांना शुक्रवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.