आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाईव्ह मर्डर: भरदिवसा घडल्या अशा हृदय पिळवटणाऱ्या घटना, व्हिडिओंमध्ये पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांपूर्वीच धुळ्यात भरदिवसा कुख्यात गुंड गुड्ड्याचा 11 जणांनी तलवारींनी कापून खून केला. त्याच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आला. त्या घटनेचा व्हिडिओ पाहून अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. राज्यात भरदिवसा लाईव्ह मर्डर कॅमेऱ्यात टिपण्याची ही पहिली वेळ नाही. राज्यभरात भर रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी झालेल्या घटनांचे काही व्हिडिओज समोर आले आहेत. त्यांचा आढावा दिव्यमराठीने घेतला आहे. 
 
 
#1 - यात पहिले प्रकरण धुळ्यातील आहे. येथे रफीहुद्दीन शेख उर्फ गुड्ड्या या स्थानिक गुंडावर 11 इतर गुंडांनी अचानक तलवारींनी हल्ला केला. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. गुड्ड्याच्या विरोधात पोलिसांमध्ये 30 हून अधिक तक्रारींची नोंद होती. 

#2 - दुसरे प्रकरण मुंबईच्या चूनाभट्टी परिसरातील आहे. येथे एक बिल्डर जिग्नेश जैन याच्या कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यात जिग्नेशचा जागीच मृत्यू झाला. 
 
#3 - तिसरे प्रकरण ठाणे जिल्ह्यातील आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्यावर त्यांच्या घराबाहेर हल्ला करून खून करण्यात आला. हल्लेखोरांनी आधी पाठीमागून गोळ्या झाडल्या, त्यानंतर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून त्यांना ठार मारले. 
 
#4 - चौथे प्रकरण अंधेरीतील आहे. या ठिकाणी गतवर्षी राजू धोत्रे नावाच्या एका व्यापाऱ्याची एका हल्लेखोराने चाकूने भोसकून हत्या केली. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले होते. 
 
#5 - पाचवे प्रकरण मुंबईतील विरार रेल्वे स्टेशनवरचे आहे. येथे काही महिन्यांपूर्वीच एका माथेफिरूने एका युवकाला चाकूने भोसकले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी दिवाळखोर हल्लेखोराला अटक केली. 
 
#6 - सहावे प्रकरण पिंपरी-चिंचवड येथील आहे. येथे एका विद्यार्थ्याला पेट्रोल पंपावर दगडाने ठेचून ठार मारण्यात आले होते. या प्रकरणी 7 आरोपींना अटक झाली आहे. 
 
#7 - सातवे प्रकरण नांदेड जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी एका भावाने आपल्याच बहिणीसह तिच्या प्रियकरावर चाकूने सपासप वार केले. यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. तर, हल्लेखोराची बहिण रक्तरंजित अवस्थेत तशीच रस्त्यावर मदतीसाठी हातवारे करत होती. ती एवढी जखमी होती की तिचा आवाज सुद्धा निघत नव्हता. तरीही स्थानिक लोक तिची मदत करणे सोडून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते. काही मिनिटांतच तिचाही मृत्यू झाला.
 
WARNING -  पुढील Videos आपले मन विचलित करू शकतात... 
बातम्या आणखी आहेत...