आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top News Of Maharashtra, Bharat Patankar Gets Death Threat

MH Top 7: पुण्यात मालकाचा आपल्याच श्वानावर गोळीबार, चार गोळ्या झाडल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- घरातील पाळीव श्वानावर मालकाने गोळीबार करण्याची भारतातील ही बहुदा पहिलीच घटना असावी. श्वानाने मुलीला चावा घेतल्याने पुण्यातील एका व्यक्तीने श्वानावर चार गोळ्या झाडल्या. पण नेम चुकल्याने चारही गोळ्या शेजारच्या घराच्या भींतीला लागल्या. सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही. श्वानही बचावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मालकाला अटक केली आहे.
श्वानाच्या मालकाचे नाव सुरेश धापटे असे आहे. त्यांनी घरी विदेशी प्रकारातील दोन श्वान पाळले आहेत. त्यातील एका श्वान रात्रीच्या सुमारास त्यांच्या मुलीला चावले. यामुळे धापटे यांचा राग अनावर झाला. त्यांनी लायसन्स असलेली बंदूक घेऊन श्वानाचा पाठलाग सुरू केला. यावेळी श्वान घरातल्या अंगणात आणि घरात पळत होता. त्यानंतर तो घराच्या गच्चीवर जाऊन लपला. धापटे हेही बंदूक घेऊन गच्चीवर गेले. त्यानंतर त्यांनी बंदुकीतून चार गोळ्या फायर केल्या. त्यातील एक गोळी बाजूच्या घराच्या खिडकीतून आरपार जात भींतीला लागली. सुदैवाने ती कुणाला लागली नाही. अन्यथा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा हकनाक बळी गेला असता. इतर तीन गोळ्या घराच्या आजूबाजूला लागल्या आहेत.
या विचित्र प्रकाराची पोलिस तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीची वातावरण पसरले आहे. धापटे यांना पोलिसांनी अटक करुन कोर्टात सादर केले. सुनावणीनंतर कोर्टाने त्यांना जामिन दिला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, डॉ. भारत पाटणकर यांना धमकीचे पत्र... कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचा दे धक्का, महानंदचे संचालक मंडळ बरखास्त....कोळसा घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचा मनमोहनसिंगांना पाठिंबा... मुंबईत टीव्ही मालिकेच्या स्टुडिओला आग...अरुण गवळी झाला नागपुरकर... गिरगावकरांना मिळणार दुप्पट क्षेत्रपळाचे घर...