आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Officers Transfering: Pardeshi, Mhaiskar Chief Secreatary Of Chief Minister

प्रमुख अधिका-यांच्या बदल्या; परदेशी, म्हैसकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर प्रमुख अधिका-यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. प्रवीण परदेशी तसेच मिलिंद म्हैसकर यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण गेडाम यांच्याकडे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्तपद देण्यात आले असून गोविंद राज यांच्याकडे मदत व पुनर्वलन खाते देण्यात आले आहे.

प्रवीण परदेशी हे वन विभागाचे प्रधान सचिव होते. त्यांना फडणवीस यांनी आपल्या खात्याची जबाबदारी देऊन एक प्रकारे बढती दिली आहे. तसेच मिलिंद म्हैसकर यांनाही फडणवीस यांनी आपल्या विभागात घेतले आहे. म्हैसकर यांच्याकडे मदत व पुनर्वसन खाते होते. परदेशी व म्हैसकर हे दोघेही माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याकडे असणारी वन व मदत पुनवर्सन खात्यांची जबाबदारी सांभाळत होते.

नाशिकला मिळाले आयुक्त
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्तपद गेल्या सात महिन्यांपासून रिक्त होते. पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने हे पद न भरल्याने नाशिकमध्ये नाराजीचे वातावरण असताना भाजप सत्तेवर येताच त्यांनी नाशिककरांची मागणी मान्य केली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी असलेल्या प्रवीण गेडाम यांनी भ्रष्टाचाराविरोधात चांगले काम केले असून ते प्रभावी सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात. नाशिकमध्ये कुंभमेळा लवकरच होणार असल्याने नाशिकला आयुक्तांची गरज होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश पाळले नाहीत
भाजपच्या मंत्र्यांनी यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे पीए व पीएस यांची आपल्याकडे नियुक्ती करू नये, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी दिले होते. मात्र, राज्यातील नूतन मंत्र्यांनी ते पाळलेले दिसत नाहीत. महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी माजी वैद्यकीय मंत्री यांच्या कार्यालयातील तीन जणांची आपल्या विभागात नियुक्ती केली आहे. पीएस म्हणून प्रवीण सवडे यांच्याकडे जबाबदारी दिली असून अन्य दोघे हे गावितांकडे कार्यालयीन कामकाज पाहत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पीए अमित देशमुख यांना संधी दिली आहे.