आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा होता अंडरवर्ल्डचा पहिला हिंदू DON, एका भीतीने गमावले साम्राज्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरदा भाई या नावाने मुंबई त्‍याला ओळखत असे. - Divya Marathi
वरदा भाई या नावाने मुंबई त्‍याला ओळखत असे.
मुंबई - वर्ष 2004 ते 2006 च्‍या दरम्‍यान भारतीय क्रिकेट संघात खेळणारे काही टॉप खेळाडू कुख्‍यात डॉन दाऊद इब्राहीमच्‍या संपर्कात होते. विशेष म्‍हणजे यातील 1-2 क्रिकेटर आजही दाऊदच्‍या संपर्कात आहेत. या शिवाय देशातील काही मोठे उद्योगपती आणि हायप्रोफाइल लोक हे आताही दाऊदसोबत बोलतात, याचा खुलासा dainikbhaskar.com वरून पाकिस्तानी पत्रकार आरिफ जमाल यांनी केला. आजही दाऊदच्‍या नावाने मुंबईला थरकाप उडतो. पण, दाऊदपूर्वी मुंबईमध्‍ये अनेक डॉन झाले. त्‍यातीलच 'वरदराजन मुदलियार' या हिंदू डॉनची दाऊदएवढीच दहशत होती. त्‍याच्‍या विषयी खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांना...

सलग तीन दशक‍ केले मुंबईवर राज्‍य
वर्ष 1960 ते 80 च्‍या दरम्‍यान मुंबईच्‍या अंडरवर्ल्ड जगात 'वरदराजन मुदलियार' हे नाव चालत होते. त्‍याची त्‍याकाळात मोठी दहशत होती. मुदलियारच्‍या काळात मुंबईमध्‍ये करीम लाला आणि हाजी मस्तान हे डॉनही सक्रिय होते. मात्र, या तिघांमध्‍ये मुदलियारची सर्वाधिक दहशत होती. तसेच गरीबाचा मसिहा म्‍हणून त्‍याची ओळख होती. त्‍यामुळे तो अधिक लोकप्रिय होता. तो मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला हिंदू डॉन होता. मात्र, हिंदू असतानाही तो रोज 'नियाज़' अदा करत होता. आपले महत्‍त्‍वाचे काम होताच दर्ग्‍यावर जात होता. बिस्मिल्ला दर्ग्‍यावर त्‍याची विशेष श्रद्धा होती.
एका पोलिसाने संपवले भय
ऐंशीच्‍या दशकात मुंबईतील काळ्या जगातील (अंडरवर्ल्ड ) वरदराजन मुदलियार हे सर्वात मोठे नाव बनले होते. माटुंगा परिसरात त्‍याचा बंगला होता. दरवर्षी या ठिकाणी तो अंत्‍यत भव्‍यतेने गणेशोत्‍सव साजरा करत होता. त्‍याची दहशत वाढतच होती. त्‍यामुळे पोलिस त्रस्‍त झाले होते. त्‍यावेळी त्‍याच्‍या गँगला संपवण्‍याचा विडा वाय. सी. पवार या पोलिस अधिका-याने उचलला आणि एक-एक करून वरदराजनच्‍या सर्वच पंटरला ठार किंवा जेलमध्‍ये डांबले. या अधिका-याला मुंबईतील हा सर्वात मोठा डॉन प्रचंड घाबरला आणि त्‍याने मुंबई सोडून चेन्नईमध्‍ये आश्रय घेतला. तिथे वर्ष 1988 मध्‍ये त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यावेळी तो 62 वर्षांचा होता.

वरदराजन होता कुली
'वरदा भाई'च्‍या नावाने या डॉनला मुंबई ओळखत असे. त्‍याचा जन्‍म तमिलनाडूच्‍या 'तूतीकोरिन' (1926) मध्‍ये झाला. रोजगारासाठी तो मुंबईत आला. सुरुवातीला व्‍ह‍िक्टोरिया टर्मिनल स्टेशनवर त्‍याने कुली म्‍हणून काम केले. याच स्‍टेशनवरून त्‍याने अमली पदार्थांची तस्‍करी सुरू केली. पुढे त्‍याचा दबदबा वाढला. नंतर त्‍याने चोरी, कॉन्‍ट्रॅक्ट किलिंगचे काम सुरू केले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा वरदराजनचे निवडक फोटोज....