आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tour Dal 100 Rupess Per Kg From Todat At Maharashtra

तूर डाळ आजपासून 100 रूपयांत; भाजप-सेनेत मात्र श्रेयवादाची लढाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मर्यादेपेक्षा जास्त डाळींचा साठा केल्यानंतर सरकारने जप्त केलेली तूर डाळ आज 100 रूपये किलो दराने विकली जाणार आहे. जप्त केलेली डाळ संबंधित व्यापा-यांना हमीपत्रावर परत केली असून, ही डाळ खुल्या बाजारात 100 रूपयांनी विकण्याचे बंधन घातले आहे. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. भाजपने आज मुंबई-पुण्यात 100 रूपये किलो दराने डाळ विकण्यासाठी स्टॉल लावले आहेत. दरम्यान, तूर डाळीचे भाव आमच्यामुळेच कमी झाल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच डाळीचे भाव कमी झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 200 रूपयांवर गेलेली 100 रूपयांवर येताच भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. आमच्यामुळेच दर खाली आले असे दोन्ही पक्षाचे म्हणणे आहे.
डाळीचे भाव मागील दोन महिन्यापासून दुप्पट-तिप्पट झाले होते. 80 रूपयांवरून तूर डाळीचे भाव 230 रूपयांपर्यंत गेले होते. व्यापा-यांनी साठेबाजी केल्यामुळेच भाव चढल्याचे पुढे आले होते. त्यानंतर सरकारने साठेबाजीवर निर्बंध आणत साठेबाजी करणा-यांवर कारवाई केली होती. या कारवाईत 90 हजार मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आली होती. ऐन दिवाळीत चढे दर असल्याने सरकारने हीच जप्त केलेली डाळ व्यापा-यांना परत करीत 100 रूपयांने विकायला आता भाग पाडले आहे. त्यामुळे तूर डाळीचे भाव खाली येत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेसह म्यानमार व इतर देशांतून देशात मोठ्या प्रमाणात डाळी आयात करण्यात येत आहेत.
2 लाख मेट्रिक टन डाळ बंदरावर

भारत सरकारने 18 ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात डाळींच्या साठ्यावर निर्बंध आणले आहेत. यामुळे अमेरिकेच्या भारतातील डाळ निर्यातदारांवर परिणाम झाला. भारतीय बंदरावर अडकलेल्या 2 लाख मेट्रिक टन डाळींच्या साठ्याचे भवितव्य संकटात सापडले होते. भारत सरकारने केवळ 350 मेट्रिक टन साठा ठेवण्याची अट घातल्यामुळे इतर देशातून भारतात होणारी आयात बंद झाली. त्यामुळे भाव वाढले होते. आता भारत सरकारने डाळ साठा नियमनावरील बंधने मागे घेतली आहेत. त्यामुळे भारतीय आयातदारांसाठी लाखो टन डाळ बंदरावर दाखल झाली आहे.
पुढे वाचा, उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यामुळेच डाळ स्वस्त झाली...
आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांमुळेच डाळ स्वस्त....