आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींच्या सरकारी खर्चाने पर्यटनमंत्री रावल जर्मनी दौऱ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे तिजाेरीवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने विकासकामांना कात्री लावली अाहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या दाैऱ्यातही काटकसर सुरू केली अाहे. असे असताना राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल मात्र एका चित्रपट महाेत्सवासाठी तीन अधिकाऱ्यांसह जर्मनीला रवाना झाले अाहेत. या दौऱ्यासाठी खरे तर  मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, राज्याची सध्याची परिस्थिती पाहता फडणवीस यांनी या दौऱ्यावर कोणीही जाऊ नये, असे आदेश दिले होते. पण मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवून रावल सरकारी खर्चाने परदेशात रवाना झाले अाहेत. 

रावल १९ जुलैपासून ३ दिवस जर्मनीच्या दौऱ्यावर अाहेत. तिथे ते चित्रपट महाेत्सवाला हजेरी लावतील, तसेच रोड शो कार्यक्रमातही सहभागी होतील.  त्यांच्या दाैऱ्याची जबाबदारी अलिका पर्पल नावाच्या एजन्सीकडे साेपवण्यात अाली अाहे. या दौऱ्यासाठी जवळपास २ कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. दरम्यान, रावलांच्या दौऱ्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
बातम्या आणखी आहेत...