आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - पोलिसांच्या विरोधात माझे भांडण नाही, त्या अधिकार्याची भाषा अश्लिल होती, चुकीची होती त्यामुळे त्याची माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य विधिमंडळात पोलिस अधिकार्याला मारहाण करण्याचा आरोप असलेल्या आमदार क्षितीज ठाकूर यांनी केले आहे.
विधिमंडळातील संपूर्ण प्रकारात सभागृहातील आमदार माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. झालेल्या प्रकाराची सर्व जबाबदारी मी माझ्यावर घ्यायला तयार आहे. या प्रकरणात जर मी दोषी अढळलो तर, राजीनामा देण्याची माझी तयारी असल्याचे आमदार ठाकूर यांनी म्हटले आहे.
मंगळवारी दुपारी निलंबीत सहायक वाहतूक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या गॅलरीत काही आमदारांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासह आमदार राम कदम, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार राजन साळवी आणि आमदार जयकुमार रावल यांच्यावर मारहाणीचा आरोप आहे. दिवसभर माध्यमांमध्ये आमदारांवर मारहाणीचा आरोप झाल्यानंतर हे सर्व आमदार क्षितीज ठाकूरसह सायंकाळी मंत्रालय परिसरात पत्रकारांच्या समोर आले.
यावेळी आमदार ठाकूर यांनी निलंबीत सुर्यवंशी हेच अरेरावी करत होते. त्यांची भाषा अश्लिल आणि अर्वाच्च होती. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांशी कसे बोलावे याचे भान त्यांना नाही. त्यांना पुन्हा प्रशिक्षणाची गरज आहे. कोणत्याही आमदारांनी त्यांना मारहाण केले नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सोमवारी वांद्रे वरळी सी-लिंकवर झालेल्या प्रकाराचे मोबाईल शुटिंग त्यांनी पत्रकारांना दाखवले. त्याची सीडी तयार केली असून ती माध्यमांना देणार आहे. जर मी चुकीचे वागलो असतो तर मी शुटिंग कशाला केली असती असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
स्लाईडला क्लिक करून वाचा, राम कदम म्हणाले सूर्यवंशींना मारहाण केली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.