आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traffic Jam On Mumbai goa Highway For Jeep And Tanker Accident

मुंबई-गोवा महामार्गावर जीप-टँकरची भीषण धडक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रायगड- मुंबई- गोवा महामार्गावर खालपाडा पुलावर जीप व टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. केमिकलने भरलेला टँकर रस्त्यावर आडवा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

खालपाडा पुल अरुंद असून याच पुलावर अपघात झाला आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पनवेलच्या बाजूनेतर ही वाहनांची रांग पक्ष‍ी अभयारण्यापर्यंत पोहोचली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून कोंडी दूर करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. पुढील एक दोन तासांत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.