आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्बर मार्गावरील टिळकनगर-कुर्ला दरम्यान रेल्वे रुळाला तडे, लोकलसेवा विस्कळीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हार्बर मार्गावरील टिळकनगर आणि कुर्ला दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडली असली तरी दिवाळीची सुट्टी असल्याने प्रवाशांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे याचा अन्य दिवशी होणाऱ्या गोंधळापेक्षा कमी प्रभाव प्रवाशांवर पडला आहे. 
 
तडे गेलेल्या रुळाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून तातडीने सुरु करण्यात आले अाहे. भाऊबीज असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे. गर्दीच्या वेळी व चाकरमाने कामावरुन घरी परततानाच ही घटना घडली आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...