आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकण रेल्वेची वाहतूक सुरू; मातीचा ढिगारा हटवला, येत्या 24 तासात मुसळधार पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे रुळावर माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
रेल्वे रुळावर माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. (संग्रहित फोटो)
मुंबई/सिंधुदुर्ग- कणकवलीजवळ ओरोस येथे रेल्वे रूळावर माती आल्याने ठप्प झालेली रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. कोकणात सध्या दमदार पाऊस होत आहे. या पावसाचा कोकण रेल्वेमार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.  येत्या 24 तासात कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
 
मुसळधार पावसाचा अंदाज 
दरवर्षी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर माती येण्याच्या आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात.  गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आज कोकणासह राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. पेण, कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव, महाड पोलादपूरसह माथेरान परिसराला आज पावसाने झोडपून काढले आहे. 
बातम्या आणखी आहेत...