आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transferance Decetralation Nescessary Jayant Patil

बदल्यांच्या विकेंद्रीकरणाची गरज : जयंत पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बदल्यांच्या प्रकरणात मंत्र्यांचा जाणारा वेळ पाहता या अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे अत्यावश्यक आहे. काही निर्णय अप्रिय वाटले तरी ते घेण्याचे धारिष्ट्य दाखवण्याची गरज असून तसे केले तरच मंत्र्यांना प्रशासकीय कामांसाठी आणि नागरिकांना भेटण्यासाठी वेळ मिळू शकेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. नाशिकमध्ये कै. वसंतराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते होते.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते पाटील यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 50 हजार रुपये रोख असे त्याचे स्वरूप आहे. पाटील म्हणाले, तलाठ्याच्या बदलीचा अधिकार तहसीलदारालाच असावा, त्याच धर्तीवर अन्य बदल्यांचे अधिकारदेखील स्थानिक पातळीवरच असणे अत्यावश्यक आहे. गेल्या काही वर्षांत पडलेली बदल्यांची प्रथा बंद केली तरच मंत्र्यांना काही क्रिएटिव्ह कामांना वेळ मिळू शकेल.