आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादात राहणारी राधे मां पुन्हा एकदा यामुळे चर्चेत, आता केले हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील एका संस्थेने 12 मुस्लिम जोडप्याचा निकाह लावला. - Divya Marathi
मुंबईतील एका संस्थेने 12 मुस्लिम जोडप्याचा निकाह लावला.

मुंबई- नेहमीच वादात राहणारी राधे मांचा एक नवा अवतार पाहायला मिळाला आहे. सोमवारी मुंबईतील माजगाव भागातील एका सामूहिक विवाह समारंभात सहभागी झाली होती. यात 12 मुस्लिम जोडप्याचा निकाह लावण्यात आला. राधे मां टल्ली बाबासह आपल्या समर्थकांसह पोहचली होती. या समारंभात राधे मांची भेट बिग बॉसचा एक्स कंटेस्टेंट एजाज खान आणि घरातून नुकताच बाहेर झालेल्या झुबेर खानसोबत झाली. सुमारे अर्धा तास लग्नात होती राधे मां....

 

- रात्री उशिरा राधे मां आपला लाल जोडा घालून त्रिसूळासह विवाह समारंभात दाखल झाली. तिच्यासोबत छोटी मां, टल्ली बाबा आणि मनमोहन गुप्ताचा मुलगा होता. 
- गर्दीतून वाचण्यासाठी राधे मां आपल्या सुरक्षा रक्षकांसह पोहचली होती. निकाह समारंभात राधे मांला पाहून सर्वच दंग झाले.
- या सामूहिक विवाह समारंभात राधे मां आल्याने अॅक्टर एजाज खान आणि झुबेर खान सुद्धा नव्या जोडप्याना शुभेच्छा द्यायला पोहचले होते.
- दोघांनी तेथील जोडप्यासह फोटोज काढले. नंतर राधे मां येताच तिला भेटायलही गेले. 
- माहितीनुसार, राधे मां सुमारे अर्धा तास या समारंभात होती आणि तिने एक-एक करत 12 नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिले.
- राधे मांचे हे नवे रूप सामील लोग चकित झाले. अनेक लोकांनी तिच्याजवळ जात आशीर्वाद घेतले. 
- या समारंभात सहभागी झाल्यानंतर राधे मां म्हणाली, "मला अशा समारंभात जायला यायला आवडते. मी जातेही बहुतेक वेळा. मात्र, मिडियातील वादांबाबत विचारले असता तिने उत्तर देण्याचे टाळले.

 

कोण आहे मां

 

- राधे मां चा जन्म पंजाबमधील गुरदासपुर जिल्ह्यातील एका शीख परिवारात झाला. तिचा विवाह पंजाबमधील राहणारे व्यापारी सरदार मोहन सिंह यांच्यासोबत झाली.
- मात्र, लग्नानंतर राधे मां ची एका महंतासोबत भेट झाली. यानंतर तिने आध्यात्मिक जीवन स्वीकारले. काही काळानंतर ती मुंबईत आली आणि राधे मां म्हणून प्रसिद्ध झाली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राधे मांचे समारंभात सामील झालेले फोटोज...

बातम्या आणखी आहेत...