आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तृतीयपथींनी मुंबईत बसवला गणपती बाप्पा, लक्ष्मी त्रिपाठीने असा धरला ताल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- तृतीयपंथ्‍यांनी यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे ठाण्यात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. दरम्‍यान, तृतीयपंथींनी लाडक्या गणरायाची मिरवणूक काढली होती. यामध्‍ये ढोलताशाच्‍या तालावर किन्नर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी ताल धरला होता. ठाण्‍यामध्‍ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी गणपतीची प्रतिष्ठापना करतात.

कोण आहे लक्ष्मी नारायण त्रिपाठी?
तृतीयपंथ व्‍यक्‍तींनी नेता आणि मानवी हक्‍काची कार्यकर्ता म्‍हणून लक्ष्मी नारायण त्रिपाठी नेहमीच प्रकाशझोतात असते. ती उत्‍कृष्‍ट भरतनाट्यम डांसरसुद्धा आहे. मुंबईच्‍या मिठीबाई कॉलेजमधून तिने बीए केले. या शिवाय ती भरतनाट्यम पोस्ट ग्रॅजुएट आहे.

पुढील स्‍लाइड्वर पाहा, तृतीयपंथ्‍यांनी बसवलेल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...