आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन अायुक्तांची उचलबांगडी, एजंट, ट्रान्सपाेर्ट लाॅबीपुढे सरकार झुकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परिवहन विभागातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराला चाप लावण्याचा प्रयत्न करणारे धडाकेबाज अधिकारी महेश झगडे यांची अखेर परिवहन आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्यभरातील आरटीओ कार्यालयांतील हजारो एजंट, वाहतूक क्षेत्रातील धनदांडगे आणि या सर्व भ्रष्टाचाराला राजकीय आशीर्वाद देणारे नेते यांच्या दबावापुढे लोटांगण घालत अवघ्या महिन्यांत झगडे यांची बदली करण्यात आली आहे.

‘एमएमआरडी’च्या धर्तीवर नवनिर्मित पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अाता झगडेंची नियुक्ती करण्यात अाली असून त्यांच्या जागी सोनिया सेठी यांची बदली केली अाहे.
सप्टेंबरमध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर झगडे यांनी आरटीअो कार्यालयातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी ‘एजंटबंदी’ची माेहीम उघडली. आरटीअाे अधिकाऱ्यांच्या अाशीर्वादाने एजंटांचा कारभार सुरू असल्याने त्यांनी एजंटांकडील रजिस्टर जप्त केले. मात्र, राज्यातील एजंटांनी त्यांच्या कारवाईला न्यायालयात अाव्हान दिले हाेते. काही राजकीय नेते अारटीअाेतील अधिकाऱ्यांचाही एजंटांना छुपा पाठिंबा होता. या सर्वांनीच राज्य सरकारवर झगडेंच्या बदलीसाठी दबाव आणला होता.
सीमा भागात असलेल्या तपासणी नाक्यांवर वाहनांकडून तसेच ओव्हरलोड असलेल्या वाहनांकडून हजारो कोटी दरवर्षी लाच म्हणून गोळा केले जात होते. या घोटाळ्याचे स्टिंग ऑपरेशन झगडे यांनीच केले आणि दाेषी ठाण्यातील आरटीओला निलंबितही केले होते. त्यामुळे सीमा नाक्यांवर नियुक्तीसाठी कोट्यवधी देणारे अधिकारी ओव्हरलोड वाहनांकडून होणाऱ्या कमाईतील लाभार्थी असलेले राजकीय नेतेही संतप्त झाले होते. वाहतूकदारांच्या लॉबीच्या दबावापुढे अखेर सरकारने नमते घेत झगडेंची बदली केली.
‘एफडीए’तही छाप
औषधनिर्मितीविक्रीत नफेखोरी करणारे विक्रेते आणि कंपन्यांच्या "सिंडिकेट'ला कायद्याची कठोर अंमलबजावणी करत झगडे यांनी अन्न अाैषध विभागातही छाप पाडली हाेती. अाैषधी दुकानदार फार्मसी पदविकाधारकच हवा, या नियमाची त्यांनी काटेकोर अंमलबजावणी केली.
रावतेंचे सीएमकडे बोट
याबदलीशी आपला संबंध नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. ‘आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री करत असतात. त्यात अाम्हाला विश्वासात घेतले जात नाही. झगडे हे चांगले अधिकारी आहेत, ते जेथे जातील तेथे चांगले काम करतील,' असे रावते म्हणाले.
माझी तक्रार नाही
माझीउचलबांगडी झाली, असे मी मानत नाही. मी राज्य सरकारचा अधिकारी असल्याने सरकार जेथे पाठवेल तेथे मी जाईल. पुणे महानगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद हीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे, असे झगडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...