आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याच्या ट्रॅव्हल्सला अपघात; सुदैवाने 35 प्रवासी बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- रस्त्यातील झाडापासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना खासगी बसवरील चालकाचा  ताबा सुटल्याने अपघात झाला. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. ही   जालना येथून मुंबईकडे जात हाेती. घाेटीजवळ रविवारी हा अपघात घडला. घोटीजवळील देवळे पूल कमकुवत झाल्याने अवजड वाहनांची वाहतूक देवळे खैरगाव शेणवडमार्गे वळवण्यात आली आहे. हा पर्यायी रस्ताही खराब झाला आहे. 

रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना येथून ३५ प्रवासी घेऊन मुंबईला जाणारी सिद्धार्थ ट्रॅव्हल्सची बस (एमएच ०४ जीपी ५५९२) शेणवड (बु.) येथील बंधाऱ्याखालून घोटी काळुस्ते रस्त्याकडे येत हाेता. त्याच वेळी रस्त्यातील झाडाला कट मारण्याच्या नादात  चालकाचा बसवरील ताबा सुटला, त्यामुळे बस रस्त्यालगतच्या खोल भागाकडे गेली. मात्र, या वेळी चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने बस रस्त्यालगतच अडकली. दरम्यान, सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले. या अपघातामुळे शिर्डी, मुंबई, अकोले या ठिकाणी जाणाऱ्या पर्यायी रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद झाली हाेती.
बातम्या आणखी आहेत...