आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tri Murder Case : Mother Father Murdered By Sun ?

तिहेरी हत्याकांड प्रकरण: आई-वडिलांची हत्या करून मुलाची आत्महत्या?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कल्याण येथे दसर्‍याच्या दिवशी उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडात पोलिसांनी सोमवारी नवा खुलासा करत हे हत्याकांड मुलानेच घडवल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्राथमिक चौकशीत दरोड्यासाठी तिघांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. ज्ञानेश्वर सुभाष वानखेडे (29), सुभाष वानखेडे (67) आणि प्रमोदिनी वानखेडे (56) अशी मृतांची नावे आहेत.

कल्याण येथील मयूरेश सोसायटीतील चौथ्या मजल्यावर ज्ञानेश्वर हा आपल्या आई- वडिलांसोबत राहतो. दसर्‍याच्या दिवशी तिघांचेही मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले होते. दरोड्याच्या हेतूने तिघांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते. मात्र, घरातील अर्धा किलो सोने तेथेच होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची अधिक खोलात जाऊन चौकशी केली. सुभाष व प्रमोदिनी यांचे हातपाय बांधलेले मृतदेह आढळून आले, तर ज्ञानेश्वरच्या तोंडाला छोट्या गॅसची पिशवी होती. त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर पवई आयटीमध्ये टेक्निशियन म्हणून कामाला होता. त्यामुळे गॅसचा वापर कोठे कसा होतो याची त्याला पूर्ण कल्पना होती. आधी त्याने आई- वडिलांची हत्या करून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

आई-वडिलांची हत्या करून आत्महत्या करण्यापूर्वी ज्ञानेश्वरने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. तसेच बहीण व तिच्या पतीलाही मेसेज केले होते. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाइकांतून होत आहे.