मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गायवळ (ता. कारंजा) आणि माहेरी (ता. मंगरुळपीर) येथे वृक्षारोपण करुन पर्यावरण सप्ताहाचा प्रारंभ केला. मुख्यमंत्री आज अकोला आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते.
ग्रामविकासाच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या आणि राज्याला दुष्काळमुक्तीकडे नेणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. लोकसहभागाच्या माध्यमातून समृद्धीकडे नेणारी जलयुक्त शिवार योजना सुरू केल्याबद्दल गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
अकोला जिल्ह्यातील गायवळ येथे पाझर तलाव दुरूस्ती आणि सिमेंट बांधाच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मंगरूळपीर तालुक्याच्या शिवनी रोड येथील मदन कालू गारवे आणि संजय टाले या आत्महत्या केलेल्या दोघा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आस्थेने चौकशी केली.
या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. मोहरी या गावात ‘
आपलं गाव- आपलं पाणी’ या योजनेंतर्गत भूजल पुनर्भरण कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेला राज्यभर मिळत असलेला प्रतिसाद आणि लोकसहभाग पाहून आपण भारावलो आहोत. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
पुढे आणखी वाचा आणि पाहा... यासंंबंधित माहिती...