आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्ती देसाईंना रुग्णालयातून सुटी, मंदिर प्रवेश प्रकरणी कोल्हापूर बंदचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - येथील महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात बुधवारी तृप्ती देसाई यांनी केलेल्या प्रवेशावेळी प्रशासनाने केलेल्या मदतीच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदचा इशारा देण्यात आला आहे. जोतिबा यात्रा आणि रामनवमी याचा विचार करून कोल्हापूर बंदची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तृप्ती यांना पोलिस संरक्षणात मंदिरात आणण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अमित सैनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष असतानाही ते मंदिराकडे फिरकले नव्हते. दरम्यान, बुधवारी लोकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तृप्ती यांना गुरुवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तृप्ती यांनी गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना भाविकांनी मारहाण केली होती. यात त्या जखमी झाल्या होत्या. दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मंदिर भ्रष्ट करण्याचा तृप्ती देसाई प्रयत्न करत आहेत, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...