आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्ती देसाई महाराष्ट्राची कन्हैयाकुमार : देवेन भारती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईमुळे मुंबई पोलिसमधील उच्चपदस्थ नाराज आहेत, कारण २८ एप्रिलला देसाईने मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच त्यांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या वेळेच्या आत आंदोलनही केले आणि पोलिस संरक्षणात दर्ग्यामध्ये जाऊन भेट दिली. ज्यामुळे परिमंडळ-एकचे पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी तृप्ती देसाई यांना महाराष्ट्राची कन्हैयाकुमार दर्शवणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) देवेन भारतीही पोलिस उपायुक्त शर्मांप्रमाणे देसाईच्या स्टंटबाजीने बरेच नाराज आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, देसाईंना शांतीपूर्ण आंदोलन करण्यासाठी २८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजताची वेळ मुंबई पाेलिसांकडून दिली होती, तर देसाईंनी हाजी अली दर्ग्याच्या मजारमध्ये प्रवेश करण्याची घोषणा न्यूज चॅनलच्या माध्यमातून केली होती.
बातम्या आणखी आहेत...