आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारमध्ये तरूणीवर पाडला करोडो नोटांचा पाऊस, काय आहे यामागचे सत्य?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारमध्ये उभी असलेल्या या महिलेवर नोटा उधळताना (डावीकडे), नोटा फेकताना लोक (उजवीकडे) - Divya Marathi
बारमध्ये उभी असलेल्या या महिलेवर नोटा उधळताना (डावीकडे), नोटा फेकताना लोक (उजवीकडे)

मुंबई- गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोट बंदीची घोषणा केली होती. यानंतर बोलले गेले की, नोटबंदीमुळे बाजारातून रोकड गायब झाली होती. मात्र, सोशल मीडियात एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात पोलिस दलांपासून ते इनकम टॅक्स डिपार्टमेंट सुद्धा झोप उडाली आहे. हा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या 20 नोव्हेंबर रोजीचा एका बारमधील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामागचे कारण काही वेगळेच आहे. व्हायरल व्हिडिओत एका तरूणीवर पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे. जी माहिती मिळत आहे त्यानुसार, या तरूणीवर एक कोटींहून अधिक रक्कम उधळली गेली. व्हिडिओ समोर येताच आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. काय आहे या व्हिडिओचे सत्य.......

 

- मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गोरेगाव भागातील असलेल्या टकीला बारमधील असल्याचे पुढे येत आहे. डान्स बारमधील हा व्हिडिओ शेयर करणा-याचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ 20 नोव्हेंबर रोजीचा आहे.  
- मात्र, जेव्हा आम्ही या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सत्य समोर आले की, पैसे उडविले जाणा-या तरूणीचे नाव काजल आहे. मात्र, काजलच्या बर्थडे निमित्त तो साजरा करताना हे पैसे उडविले आहेत.
- चौकशीत हे सुद्धा समोर आले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा नव्हे तर यावर्षीच्या 12 फेब्रुवारीचा आहे. हा व्हिडिओ रवी नावाच्या व्यक्तीने शूट केले आहे. 
- चौकशीत हे समोर आले की, रवी काही दिवसापूर्वी टकीला बारचा पार्टनर होता. त्यानंतर त्याचे आपल्या पार्टनरसोबत वाद झाला आणि दोघे वेगळे झाले. 

 

पोलिसांनी चौकशी केल्यावर समोर आले सत्य- 

 

- काजलवर त्या रात्री किती पैसे उडविले हे स्पष्ट झाले नाही. मात्र, हे नक्की म्हणता येईल की, ही रक्कम एक कोटींहून अधिक होती.
- चौकशीत हे सुद्धा समोर आले आहे की, काजल नावाच्या या तरूणीवर पैसे उडविणारी व्यक्ती बंगलोरचा एक व्यवसायिक आहे. जो काजलचा लव्हर असल्याचे सांगितले जाते. 
- काजल आता मुंबईहून बंगलोरला शिफ्ट झाली होती. व्हिडिओ समोर येताच आता मुंबई पोलिस आणि आयकर विभागाने याची सत्यता पडताळली आहे.
- नुकताच मृत्यूमुखी पडलेल्या मुद्रांक (स्टॅम्प पेपर) घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीने मुंबईतील एका बारमध्ये तरन्नुम खान नावाच्या बार गर्लवर 90 लाख रुपये उडविले होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...