आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त तुकाराम मुंढेंविराेधी ठराव लोकशाही मार्गानेच, NCP कडून नगरसेवकांची पाठराखण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘नवीमुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव हा लोकशाही मार्गाने आणला होता. त्यात काही गैर नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा ठराव अाणणाऱ्या अापल्या नगरसेवकांची पाठराखण केली. हा ठराव केवळ राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेच्याही नगरसेवकांनी आणला होता, अशी पुष्टीही त्यांनी जाेडली. मुंढेंविराेधातील पुढची कारवाई आता सरकारने तातडीने करावी, अशी मागणीही तटकरेंनी केली.

पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, ‘महापालिका, जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुख्य पदावर असलेले अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची कायद्यातच तरतूद आहे. त्यानुसारच मुंढेंविराेधात ठराव अाणला गेला. नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींचा अवमान होणार असेल तर असे पाऊल हे उचलावे लागते. साेलापूरचे जिल्हाधिकारी असताना याच मुंढेंची बदली करण्याची मागणी भाजपच्या पालकमंत्र्यांनी केली होती याची आठवणही तटकरे यांनी करून दिली.

दरम्यान, अायुक्त तुकाराम मुंढेंवर नगरसेवकांनी बहूमताने अविश्वास ठराव मंजूर केला असला तरी राज्य सरकारने अद्याप त्यांच्यावर काेणतीही कारवाई केलेली नाही. बुधवारी मुंढे मंत्रालयातही अाले हाेते. मात्र त्यांनी काेणाच्या गाठीभेटी घेतल्या याबाबत गाेपनीयता पाळण्यात अाली. अापण नियमित कामासाठी अालाे हाेताे, एवढेच मुंढे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...