आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे पकडले होते कसाबला, ASI च्‍या पोटात डागल्‍या AK-47 मधून 20 गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 26 नाव्‍हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्‍ला झाला. त्‍यामुळे संपूर्ण जग हादरून गेले होते. सैतानालाही लाजवेल असे क्रुर कृत्‍य करताना लष्करे तोयबाच्‍या दहशतवाद्यांनी मुंबईती प्रमुख मार्ग, ताज हॉटल, सीएसटी रेल्‍वे स्टेशन, नरीमन हाऊस, कामा हॉस्पिटल अशा महत्‍त्‍वाच्‍या ठिकाणी सामान्‍य नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्‍ये 166 निष्‍पाप व्‍यक्‍ती ठार झाल्‍या. शिवाय महाराष्‍ट्र पोलिस दलातील 14 अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. दरम्‍यान, हल्‍लेखोरापैकी अजमल कासाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्‍यास पोलिसांना यश आले होते. त्‍याला कसे पडलडे याची विशेष माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
तुकाराम ओंबळे यांनी पकडले कासाबला
साहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी कासबला जिवंत पकडले. दरम्‍यान, कासाबने त्‍यांच्‍या पोटात एके-47 ने 20 गोळ्या मारल्‍या. यात ओंबळे गंभीर जखमी झाले. मात्र, त्‍यांनी कासाबला सोडले नाही. यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. ज्‍या ठिकाणी त्‍यांनी कासाबला पकडले तिथे त्‍यांचा पुतळा बसवण्‍यात आला. ओंबळे यांचा मरणोपरांत अशोक चक्र देऊन गौरव करण्‍यात आला. विशेष म्‍हणजे त्‍यांनी जेव्‍हा कासाबला पकडले होते तेव्‍हा त्‍यांचा हाता केवळ एक दंडा होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा काय आणि कसे झाले...