आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tulajapur Temple Robbery News In Marathi, Maharashtra

तुळजाभवानी दानपेटी चोरीची चौकशी रखडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या दानपेटीतील अपहाराच्या चौकशीस विलंब होत असल्याचे उत्तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले.

डॉ. अपूर्व हिरे यांनी सदर प्रश्न मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये उपस्थित केला होता. उस्मानाबद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात अपहाराचा प्रकार घडला होता. 1991 ते 2009 या 20 वर्षांच्या काळातील दानपेटीतील अपहाराची सध्या चौकशी चालू आहे. मंदिरातील सिंहासन दानपेटीसंबंधी कागदपत्रे तपासण्याचे काम चालू आहे. लेखापरीक्षणाचा अहवाल शासनाला उपलब्ध होणे बाकी आहे. तसेच मंदिर
संस्थानकडून संपूर्ण माहिती मिळालेली नाही. त्यामुळे चौकशी रखडल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.