मुंबई- छोट्या पडद्यावरील अभिनेता सनिल सोधीला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. सनिलने आपल्या ब्लॅकबेरी मोबाईलवर स्वत:ची काढलेली 25 नग्न छायाचित्रे आपल्या मैत्रिणीला ई-मेलवर पाठविली होती. त्यानंतर संबंधित विवाहित महिलेने सनिलविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सनिलला रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम 509 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोधी याने आतापर्यंत छोट्या पडद्यावर काम केले आहे. त्याने रिश्ते आणि हम या मालिका केल्या आहेत. याचबरोबर त्याने सुनील शेट्टी आणि तब्बू यांची भूमिका असलेल्या 'हू-तू-तू' व जया बच्चन आणि नंदिता दास यांच्या "हजार चौरासी का माँ' या सिनेमातही काम केले आहे.