आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: टीव्ही अभिनेत्रीशी छेडछाड केल्याप्रकरणी राखी सावंतच्या भावाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राकेश सावंत (फाईल फोटो) - Divya Marathi
राकेश सावंत (फाईल फोटो)
मुंबई- मराठी अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश सावंत याला टीव्ही अभिनेत्री रितु खन्ना हिच्याशी छेडछाड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आले. टीव्ही अभिनेत्री ऋतू खन्नासोबत आक्षेपार्ह वर्णन आणि धमकी दिल्याचा राकेशवर आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
- मुंबईतील ओशिवारा लोखंडवाला भागात एक कॉफी हाऊस आहे.
- शुक्रवारी रात्री अभिनेत्री रितु खन्ना आपला ब्वॉयफ्रेंड रोहित कपूरसोबत तेथे गेली होती.
- कॉफी शॉपमध्ये आधीच राकेश आपल्या मित्रांसह तेथे उपस्थित होता.
- आरोप आहे की, त्यावेळी राकेश व त्याच्या मित्रांनी रितुबाबत कमेंट्स पास करणे सुरु केले.
- रितु खन्ना मॉडेल आणि फिल्म एक्ट्रेस आहे. तिने‘झांसी की रानी’, ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ ‘शकुंतला’ यासारख्या मालिकांत काम केले आहे.
रितुने काय केले आरोप?
- रितुबाबत आक्षेपार्ह वर्णन करून वाईट कमेंट्स केल्या. मोबाईलद्वारे तिचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला.
- रितुचा ब्वॉयफ्रेंड रोहित कपूर याच्या माहितीनुसार, रितुवर कमेंटस करण्यापूर्वी दारूच्या नशेत असलेल्या राकेश सावंत आणि त्याच्या मित्रांनी एका कपल्ससोबत आक्षेपार्ह वर्तन केले होते.
पोलिसांत प्रकरण कसे गेले?
- रोहित कपूरच्या म्हणण्यानुसार, रितुचे फोटो घेण्यावरून वाद सुरु झाला. रोहितने पोलिस कंट्रोल रूमला फोन करून बोलावून घेतले.
- यानंतर पोलिसांनी राकेशला ताब्यात घेत अटक केली.
- पोलिसांनी कॉफी हाऊसमधील सीसीटीव्ही फुटेज मागवून घेतले आहे. त्याची पाहणी केली जात आहे.
पोलिसांचे काय म्हणणे आहे?
- पोलिसांचे म्हणणे आहे की, घटनेवेळी राकेश व त्याचे मित्र दारूच्या नशेत होते.
- यानंतर पोलिसांनी रितु खन्नाच्या तक्रारीनंतर आक्षेपार्ह वर्तन व धमकी देण्याच्या आरोपावरून राकेशविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.
- दरम्यान, पोलिसांनी राकेशला पर्सनल बॉन्डवर जामीन मंजूर करीत सोडून दिले आहे.
राकेशचे म्हणणे काय आहे?
- राकेशने आपण काहीही केले नसल्याचे सांगत निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
- राकेशने सांगितले की, मी तिला ओळखत नाही, किंवा मी तुझ्याशी कोणतेही वाईट वर्तन केलेले नाही.
- या प्रकरणात राखी सावंतचे नाव का घेतले जात आहे. तिला बदनाम करू नका.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...