आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री जुई गडकरीला धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारणारी कल्याणी म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीला अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. जुईचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्त ती आपल्या कर्जतच्या घरी आली असता तिला धमकीचे पत्र मिळाले. तसेच याबाबत पोलिसांना कळवले तर कुटुंबीयांचेही बरे-वाईट केले जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर जुईने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.