मुंबई- छोट्या पडद्यावर काम करणा-या एका अभिनेत्रीचे लौंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी एका प्रॉडक्शन कंपनीतील माजी निर्मात्याला अटक केली आहे. 28 वर्षाच्या एका अभिनेत्रीने आरोप केला आहे की, 2 डिसेंबर रोजी प्रॉडक्शन कंपनीत काम करणा-या एका निर्मात्याने माझे लौंगिक शोषण केले. पोलिसांत ही तक्रार सुमारे दीड महिन्यांनी दिली आहे. यावर या अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, मी भीतीने तक्रार केली नव्हती. मात्र पतीच्या तक्रारीनंतर आरोपीला प्रॉक्शन हाउसमधून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने मला धमकीचे फोन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला अखेर तक्रार दाखल करावी लागली. पोलिस आता दोघांची मेडिकल तपासणी करीत आहेत.