टीव्ही सीरियल 'स्वरागिनी'तील स्वरा अर्थात अॅक्ट्रेस हेली शाह हिच्या कारवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. हेली हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन चोरट्यांचा शोध घेत आहेत.
- मिळालेली माहिती अशी की, हेली ही आपल्या कुटुंबीयांसोबत मीरा-भाईंदरमधील पूनम कॉम्पलेक्समध्ये राहाते. तिथेच ती कार पार्क करते. बुधवार सकाळी तीन चोरांनी तिची कार लांबवली.
- हेली हिने सांगितले की, सकाळी उठून पाहिले तर तिला कार दिसली नाही. तिने तत्काळ सीसीटीव्ही पाहिले.
- तीन चोरटे पहाटे 3 वाजून 20 मिनिटांला एक कारमध्ये येतात. पार्किंगममध्ये उभ्या कारजवळ जातात. दरवाजा उघडतात. कारमध्ये बसतात आणि कार चोरून नेतात, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले.
- हेली शाहने या प्रकरणी मीरा रोडच्या कनिका पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
कोण आहे अॅक्ट्रेस हेली शाह?
- टेलीव्हिजन सीरियल 'देवांशी'नंतर कलर्स चॅनलवरील 'स्वरागिनी'ने हेली शाह हिला लोकप्रियता मिळवून दिली आहे.
- गुजरातमधील अहमदाबाद येथे हेलीचा जन्म झाला होता. तिने स्टार प्लसवरील 'गुलाल' सीरियलमधून आपल्या करियरची सुरूआत केली. तेव्हा ती आठव्या वर्गात शिकत होती.
- ती लाइफ ओकेवरील सीरियल 'लक्ष्मी हमारी सुपर बहू'मध्येही दिसली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. या घटनेशी संबंधित फोटो...