आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी नापास तावडेंनी दहावीत बसवला डमी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे बाेगस पदव्या मिरवणारे शिक्षणमंत्री आहेत. ते बीई तर सोडाच, पण दहावी व बारावीही पास नाहीत. दहावीतही डमी बसवून ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे बारावी उत्तीर्ण होण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून त्यांनी बीई केले आहे त्या विद्यापीठाकडून बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यावरून ते बारावी अनुत्तीर्ण (फेल) असल्याचे स्पष्ट दिसते,’ असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेत मलिक सतत तावडेंचा ‘बोगस’ असा उल्लेख करत होते. तावडेंसारखा बोगस पदव्या मिरवणारा शिक्षणमंत्री असेल तर मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही थोड्याच दिवसांत व्यापमं घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्याकडे बोगस पदवी असल्याचे याआधीच दिसून आल्याने त्यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

मी राज्याचा तंत्रशक्षणमंत्री होतो तेव्हा २००४ मध्ये पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाने १२ वी फेल विद्यार्थ्यांना आम्ही इंजिनिअर करू, अशी जाहिरात दिली होती. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात गेलो आणि २००५ मध्ये ज्ञानेश्वर विद्यापीठ बोगस असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यानंतरही तावडे सातत्याने आपण बीई इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याचे सांगत राहिले. आजही त्यांच्या वेबसाइट, फेसबुक, टिवटरवर ते इंजिनिअर असल्याचे सांगतात. तावडे हे दहावीला डमी बसवून पास झाले, असे सांगणारी एक ४५ वर्षीय व्यक्ती आमच्याकडे आली आहे. हे विधान मी जबाबदारीने करत आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

पुढे वाचा... आरोप सिद्ध झाल्यास राजकारण साेडू