आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twelth Biology And Chemistry Examination On 17 And 26 March

बारावी बायोलॉजी, केमिस्ट्री पेपर 17 व 26 मार्च रोजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्यामुळे बारावी विज्ञान शाखेतील जीवशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रसायनशास्त्राचा सुधारित अभ्यासक्रमाचा पेपर आधी 27 फेब्रुवारी 2013 रोजी होता. तो आता मंगळवार, दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत होईल. तर जीवशास्त्र या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमाचा पेपर आधी 4 मार्च रोजी होता. तो आता 17 मार्च 2013 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत घेण्यात येईल. शिक्षण मंडळाने शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी यावर गुरुवारी मंत्रालयात चर्चा केली.