आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघनाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; वडिलांचा चाकू लागून झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोरेगावच्या मेघना अगवणेच्या मृत्यूप्रकरणी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शेजारी राहाणार्‍या लोकांच्या टोळक्याने बादलीने बेदम मारहाण करून मेघनाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, मेघनाच्या वडिलांकडूनच चुकून तिला चाकू लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मेघनाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आता तिच्या वडिलांना आरोपी काले आहे.

मिळालेली माहिती अशी की, शेजाऱ्यांसोबत भांडण सुरु असताना मेघनाच्या छातीत तिच्या वडिलांच्या हातातील चाकू लागला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्ता न बदलल्याने बादलीने केला हल्ला, वाचा... काय आहे हे प्रकरण?
- गोरेगावमध्ये सोमवारी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 
- अकरावीची विद्यार्थिनी मेघना अगवणे ही क्लासहून घरी परत येत होती. 
- घराशेजारी राहाणारा नागवार गुजरी रस्ता झाडत होता. त्याने मेघनाला रोखले. तिला दुसरीकडून जाण्यास सांगितले. मात्र, मेघनाने त्याचे ऐकले नाही. ती रस्त्यावरुन गेली. याचा राग आल्याने नागवारने मेघनावर बादलीने हल्ला केला. मेघनाला बेदम मारहाण केली. ती रडत-रडत घरी गेली. 
- मेघनाने सगळा प्रकार आई-बाबांना सांगितला. त्यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
- मेघनाच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्याचे नागवार याला समजले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...मेघनाला लाता, बुक्क्यांनी बेदम मारहाण

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...