आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#meatban वर भडकले TWITTER युजर्स, मुंबईला म्हटले Ban-istan

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मीरा-भाईंदर महानगर पालिके पाठोपाठा आता मुंबई महापालिकेने मांस-मटण विक्रीवर चार दिवसांची बंदी घातली आहे. मीरा-भाईंदर महानगर पालिकेने आठ दिवस मांस-मटण खरेदी-विक्रीवर बंदी घातल्यानंतर मंगळवारी ट्विटर युजर्सनी त्याविरोधात रोष व्यक्त केला आहे. ट्विटर युजर्सनी मुंबईला Ban-istan घोषित केले आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारविरोधात एवढे ट्विट करण्यात आले आहे की #meatban ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आले आहे.
काय आहे प्रकरण
मुंबई जवळील मीरा-भाईंदर महानगर पालिकेने 11 सप्टेंबर पासून आठ दिवस मांस-मटण बंदी लागू केली आहे. जैन समुदायाच्या पर्युषण पर्वानिमीत्त महापालिकेने ठराव आणून ही बंदी लागू केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) या निर्णयाला राज्यात आणि केंद्रात त्यांचा सहकारी असलेल्या शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध केला आहे. तर, मांस-मटण विक्रेत्यांचे म्हणणे आहे की एवढे दिवस दुकान बंद ठेवले तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात एक ते दीड लाख जैन समुदायाची लोकसंख्या आहे तर, पालिकेची एकूण लोकसंख्या साडेसात ते आठ लाखांच्या आसपास आहे.
ट्विटर युजर्सच्या प्रतिक्रिया
@randomcards
Ban beef. Ban meat. Ban criticising politicians. Ban consenting adults from meeting. Welcome to #Mumbai, capital of Ban-istan #meatban

@bombaylives
So this year in Bandra Fair be content with eating Chana, No Non-veg at the food stalls and East Indian stuff #meatban
@tweetria
Guys we didn't work our ways to the top of the food chain just so you can eat grass again
@AarSee
If due to one community's belief others should leave meat, will due to other's beliefs veggies eat meat? #meatban

@lindsaypereira
"We don't care about hospitals, toilets, good roads, railways or safety. We are interested in what you watch and eat." — BJP. #meatban
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ट्विटरवर कशी उडवली मटण बंदीची खिल्ली