आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांच्या देवाण घेवाणीतून झाली अभिनेत्री कृतिका चौधरीची हत्या; दोघे अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृतिका चौधरी - Divya Marathi
कृतिका चौधरी
मुंबई- मॉडल आणि अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्येच्या तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. थोड्याचवेळात पोलिस दोन्ही आरोपींना मीडियासमोर हजर करणार आहे. कृतिकाची हत्या कोणत्या कारणामुळे झाली, याचा खुलासा करणार आहे.

दरम्यान, 12 जूनला रात्री कृतिकाची तिच्या राहात्या घरी निर्घृण हत्या करण्‍यात आली होती.

पनवेलमधून घेतले दोघांना ताब्यात...
- पोलिस सूत्रांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेल येथून अटक केली. दोघेही आधीपासूनच कृतिकाला ओळखत होते. कृतिकाची हत्या झाली त्या रात्री दोघे तिच्या घरीच होते. पैशाच्या देवाण घेवाण करण्‍यासाठी ते कृतिकाच्या घरी गेल्याचे दोघांनी कबूल केले आहे. कृतिकासोबत दोघांची बाचाबाची झाली. दोघांपैकी एकाने फायटरने कृतिकाची निर्घृण हत्या केली.
- कृतिका ड्रग्जच्या आहारी गेल्याचे चौकशीत समोर आले आहे. ड्रग्ज माफीयाच्या ती संपर्कात होती. ती त्यांच्यासाठी काम करत होती. त्यातून तिने मोठा पैसाही कमावला होता. त्यावरून तिचे साथीदारांसोबत वाद झाला होता.
- कृतिकाची हत्या करण्‍यापूर्वी मारेकर्‍यांनी तिच्या घरी जेवणही केले होते. कृतिकाची हत्या केल्यानंतर मारेकर्‍यांनी तिच्या रुममधील एसी सुरु केला होता. नंतर घराची साफसफाई केली होती.
- कृतिका आरोपींच्या संपर्कात होती, हे तिच्या कॉल रेकॉर्ड्‍सवरून समोर आले आहे. दोन्ही आरोपी ड्रग्ज सप्लायर आहेत. ते अनेकदा कृतिकाच्या घरीही आले होते.

वॉचमनने दिली महत्त्वपूर्ण माहिती...
- कृतिका राहात असलेल्या सोसायटीच्या वॉचमनने पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. कृतिकाची हत्या झाली त्या रात्री दोन जणा एक पॅकेट देण्यासाठी ‍तिच्या घरी आले होते. पॅकेटमध्ये कृतिकाच्या औषधी असल्याचे त्यांनी सांगितले होते.
- वॉचमनने सांगितले की, कृतिकाला भेटण्यासाठी नव-नवीन लोक येत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा छडा लावला होता.

कृतिकाने कंगनासोबतही काम केले होते...
- कृतिकाच्या शेजारी राहाणार्‍या लोकांनी सांगितले की, तिला भेटण्‍यासाठी नेहमी वेगवेगळे लोक येत होते. मात्र, तिच्यावर संशय येईल असे तिचे वर्तन कधीच दिसले नाही.
- कृतिका ही अंधेरीतील चार बंगला भागात भैरवनाथ SRA बिल्डिंगमध्ये राहात होती. तिने कंगना रनोटसोबत 'रज्जो' ‍सिनेमामध्ये काम केले होते.
- क्राइम सीरियल ‘सावधान इंडिया’सह बालाजी प्रॉडक्शनच्या अनेक टीव्ही सीरियल्समध्ये ती झळकली होती.

साइन केले होते सिनेमा...
कृतिकाच्या बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. मात्र बिल्डिंगसमोरील साई मंदिर आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या बिल्डिंगमधील तीन सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची पोलिसांनी मदत घेतली होती.  
- कृतिकाने तमिळ, तेलुगु भाषेतील एक सिनेमा नुकसात साइन केला होता. शूटिंगही सुरु होणार होती.

कृतिकावर अत्याचार झाल्याचा संशय, अर्धनग्नावस्थेत आढळला होता मृतदेह
कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचे गूढ वाढत असून तिचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडल्याने हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आधी पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान, कृतिकाचे ज्या तरुणाशी तिचे शेवटचे बोलणे झाले होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली होती.

कृतिका अंधेरी येथील भैरवनाथ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहत होती. पाच दिवस तिचा फ्लॅट बंद असल्याने शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिचा मृतदेह आढळून आला होता. कृतिकाचे मोबाइल डिटेल्स पोलिसांनी मिळवले आहेत. यातील बहुतांश तरुण हे ड्रग्जच्या आहारी गेल्याचे समोर आले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...