आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Coreor For Water, Distrubution To Tehasildar

पाण्यासाठी दोन कोटींचा निधी ; वितरणाचे अधिकार तहसीलदारांकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील अनेक भागांमध्ये भेडसावत असलेली पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज दोन कोटी रुपयांपर्यंतचा निधी पाण्यासाठी खर्च करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.

या बैठकीमध्ये पाणी, चारा आणि रोजगार अशा सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. राज्यात सध्या 1381 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून त्यातील सोलापूरमध्ये 227, अहमदनगर 203, सातारा 200, औरंगाबाद 141, उस्मानाबाद 134, बीड 102, नाशिक 36, नांदेड 31, जळगाव 28 आणि बुलडाण्यामध्ये 27 टँकर्स पुरवले जातात. टंचाईग्रस्त भागामध्ये तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने एकूण 413.98 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचे कदम यांनी सांगितले. राज्यामध्ये सध्या 395 चारा छावण्या असून त्याचा फायदा 3.35 लाख जनावरांना होत आहे.

आतापर्यंत छावण्यांवर 223 कोटी रुपये खर्च झाले आहेत. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत 18,960 कामे सुरू असून 1.48 लाख मजूर उपस्थिती आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 778 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातील 563 कोटी रुपये शेतपिकांच्या नुकसानभरपाईपोटी देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.