आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत भरधाव कारने दोघांना चिरडले; कारचालक परमार अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वांद्रे येथील वांद्रे- खार लिंक रोडवर एका भरधाव होन्डा अकॉर्ड या गाडीने दोघांना चिरडले तर पाच जणांना गंभीर जखमी केले. महेश अजवानी आणि बाळकृष्ण राणे अशी दोघं मृत व्यक्तीची नावे आहे. कारचालक मोबीन परमारे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. हा अपघात बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास झाला.

मोबीन याने आधी मोटरसायकलला धडक दिली. तयात महेश अजवानी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने एका रिक्षाला धडक दिली. त्यात चालक बाळकृष्ण राणे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चार गाड्यांनाही धडकली. त्यात पाच जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत.