आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Die In Firing At Air Force Station In Mumbai

मुंबईत एअरफोर्स स्टेशनमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये दोन जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सांताक्रुझ येथे एअरफोर्स स्टेशनमध्ये ड्युटीवर असणा-या एका सुरक्षा रक्षकाने आपल्या सहका-यांवर केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी आहेत.
या घटनेनंतर आरोपी आर.एस.यादव याने घटनास्थळाहून फरार होण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्मल नगर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले आहे. गोरेगाव परिसरात त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास केला जात आहे.
मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी यादव याने त्याच्या सहका-यांवर एकूण सात गोळ्या झाडल्या. यावेळी इतर सुरक्षारक्षक गेटजवळ झोपलेले होते. पण गोळीबारात दोघे जागीच ठार झाले, तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. घटनेनंतर जखमींना लगेचच व्ही.एन.देसाई रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, त्यापैकी सोमदत्ता आणि एच.के.सिंग या दोघांना मृत घोषित करण्यात आले. इतर दोघांपैकी एकावर देसाई रुग्णालयात तर दुस-यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
घटनेच्यावेळी ड्युटीवर एकूण सात सुरक्षारक्षक होते. गोळीबारानंतर इतर जवानांनी यादवला पकडले आणि त्यांच्याकडील रायफल ओढून घेतली. मात्र यादव फरार होण्यात यशस्व झाला. जखमींची नावे भीमसिंह आणि थापा अशी आहेत.