आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील दोनशे कुटुंबांचे मुंबईत स्थलांतर, दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुमारे २०० कुटुंबांनी मुंबईत स्थलांतर केले आहे. ही कुटुंबे घाटकोपर येथे वास्तव्यास असून यातील काही जणांना नियमित काम मिळत आहे. दरम्यान, या कुटुंबांकडून काही गुंड प्रवृत्तीचे लोक पाण्यासाठी खंडणी वसूल करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिस उपायुक्त विनय राठोड म्हणाले, स्थलांतर केलेल्या मराठवाड्यातील लोकांकडून पाण्यासाठी काही जण खंडणी वसूल करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस यावर लक्ष ठेवून आहेत. नांदेड जिल्ह्यातील संजय नामक युवकाने आपल्या दोन भावांसह मुंबईत स्थलांतर केले आहे. संजय म्हणाला, माझ्याकडे चार एकर जमीन आहे. मात्र, पाणीच नसल्याने शेती करायची कशी. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईचा आसरा घ्यावा लागला. सध्या आम्हाला चारशे रुपये रोज मिळतात. मात्र, रोजच काम भेटेल याची खात्री नाही. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंंडेशननेही मराठवाड्यातून आलेल्या नागरिकांची राहणे व जेवणाची व्यवस्था केली आहे.

स्थलांतर संख्येत वाढ
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील काही कुटुंबे उन्हाळ्यात येथे वास्तव्याला येत आहेत. ही कुटुंबे रोज मजुरी काम करतात. यातून त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळतात. यंदा स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

पुढे वाचा... अन्न, पाण्यासह वैद्यकीय सुविधा देऊ
बातम्या आणखी आहेत...